बाळासाहेबांचा वारसा मीच चालवतोय : राज ठाकरे
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । हिंदुत्व किंबहुना वारसा हा पिढ्यानपिढा येत नाही वारसा हा विचारांचा हवा पिढ्यान्नपिढ्या वारसा आला की तो संपत जातो. आणि तीच वेळ आता शिवसेना किंबहुना उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. यामुळे बाळासाहेबांचा खरा वारसा मीच चालवतोय असा दावा राज ठाकरे यांनी एका प्रसार माध्यमाच्या मुलाखतीमध्ये केला.
बाळासाहेबांच्या आजूबाजूला असणारी माणसं हि बाळासाहेबांच्या विचारामुळे त्यांच्या बाजूला होती. बाळासाहेबांचा विचार थोर होता. त्यांचा विचारामुळे लोक त्यांच्याकडे जात होते. मात्र शिवसेनेचा विचार बदलल्यामुळे आता शिवसेना फुटायची पाळी आली अशी टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली.एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तानाट्य घडलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायऊतार व्हावं लागलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झालं नसतं अस राज ठाकरे म्हणले.
शिवसेनेमध्ये झालेला बंड आणि शिवसेनेतून फुटलेली माणसं याचं केवळ आणि केवळ खापर जर कोणाला फोडायचं असेल किंबहुना श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर हे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांनाच दिलं पाहिजे. संजय राऊत हे केवळ मोहरा आहेत यात चूक केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांची आहे. उद्धव ठाकरे किंबहुना शिवसेनेचा आता एक पिंड बनला आहे तो पिंड म्हणजे चांगल्या काळात संपत्ती कमवायची आणि वाईट काळात सिंपथी कमवायची.
शिवसेना फुटण्यासाठी केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत कारण गेल्या काही काळामध्ये त्यांना मिळालेली सत्ता ही नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब यांच्या आशीर्वादामुळे मिळाली मात्र उद्धव ठाकरे यांनी दोघांच्याही विचाराला बगल दिली. उद्धव ठाकरे यांनी जर हिंदुत्वला बगल दिली नसती आणि हिंदुत्वासाठी एक जरी केस स्वतःच्या अंगावर घेतली असती तर आतापर्यंत शिवसेना फुटलीच नसती.