⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

Chopda Murder : कौटूंबिक वाद विकोपाला, पतीने धारदार शस्त्राने पत्नीची केली हत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२३ । चोपडा तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटूंबिक वादातून धारदार शस्त्राने पतीने पत्नीची हत्या केली. रेखाबाई दुरसिंग बारेला (वय ४४) असं मयत महिलेचं नाव असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर फरार झालेल्या संशयित आरोपी पती दुरसिंग बारेला (४७) ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धनवाडी येथील योगीराज पाटील यांच्या शेतात दुरसिंग बारेला व पत्नी रेखाबाई बारेला यांच्यामध्ये सोमवारी रात्री उशिरा कुठल्यातरी वादातून जोरदार भांडण झाले त्यानंतर पतीने संतापाच्या भरात पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत खून केला.

या हत्येनंतर संशयित पसार झाला होता तर मुले आईच्या मृतदेहाजवळ बसून होती. मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांनी धाव घेतली. चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी २४ तासात खुनाची उकल करीत आरोपीला अटक केली. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.