जळगाव हादरलं ! पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून पतीची रेल्वेखाली उडी

ऑगस्ट 19, 2025 4:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना बोरनार (ता.जळगाव) येथे आज मंगळवारी (दि. 19) उघडकीस आली असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

crime 1

काय आहे नेमकी घटना?

जळगाव तालुक्यातील बोरनार येथील प्लॉट एरिया येथे आनंदा महारू धनगर (42) पत्नी रेखा व दोन मुलांसह वास्तव्यास होते. आज मंगळवारी (दि. 19) सकाळी 6 वाजता किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या भांडणात पती आनंदाने पत्नी रेखा धनगर हिच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेखा धनगर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पत्नीवर हल्ला केल्यानंतर आनंदा धनगर यांनी (दि. 19) सकाळी 7 वाजता म्हसावद रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पती-पत्नीतील वाद टोकाला गेल्याने घडलेली ही आत्मघातकी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now