---Advertisement---
जळगाव जिल्हा

दुर्दैवी घटना : जिल्ह्यात वीज कोसळल्याने ९ शेळ्या ठार; गुराखी थोडक्यात बचावला

---Advertisement---


जळगाव लाईव्ह न्युज| सुभाष धाडे | संध्याकाळी परीसरात झालेल्या अवकाळी पावसात मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथे विज कोसळुन ९ शेळ्या ठार झाल्याची दुर्वांवी घटना समोर आली आहे. यात सुदैवाने गुराखी बालंबाल बचावला.

lighting death jpg webp webp

रामगड येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्यासाठी वस्ती जवळच्या पाझर तलावा लगत गेला होता.सायंकाळी साडे-चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने सुरुवात झाली.दरम्यान घरी परतीच्या वाटेवर असलेल्या शेळ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळून नऊ शेळ्या जागीच ठार झाल्या.या घटनेत अतुल यास किरकोळ दुखापत झाली असुन उपचारार्थ मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

---Advertisement---

यात गुलाबसिंग बिलाले यांच्या ५ शेळ्या,तारासिंग बिलाले यांच्या ३ शेळ्या,लटु बिलाले यांची १ अशा एकुण ९ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यत प्रशासनाकडुन घटनास्थळी पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सुरु होती. उचंदे येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत लोढे यांनी घटनास्थळाकडे तातडीने धाव घेत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---