---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जळगावात वाळूमाफियांकडून महसूलच्या पथकावर हल्ला मात्र..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक जोमाने सुरु असून शुक्रवारी महसूलच्या पथकावर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळूमाफियांनी हल्ला केल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, पथकातील नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी या चर्चेचे खंडन केले असून असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.

mob attack

जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्याने शहर, तालुका परिसरात दिवसरात्र अवैध वाळू वाहतूक सुरु असते. जिल्हा प्रशासनाकडून नवीन धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने वाळूमाफियांचे फावले होते. शनिवारी जळगावच्या सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल होत असून महसूल विभागाच्या पथकावर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हल्ला झाल्याचे त्यात नमूद आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकात नायब तहसीलदार विशाल सोनवणे, तलाठी मनोज सोनवणे, तलाठी वंजारी यांचा समावेश असल्याचे समजते.

---Advertisement---

नशिराबाद हद्दीत वाळूमाफियांशीही वाद झाल्यानंतर हे प्रकरण नशिराबाद पोलीस ठाण्यात देखील पोहचले होते मात्र त्यानंतर कोणताही गुन्हा दाखल न करता पथक माघारी फिरल्याची चर्चा आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी तलाठी मनोज सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. पथकातील नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, महसूल पथकावर कोणताही हल्ला झालेला नाही. हा प्रकार म्हणजे केवळ अफवा असून खोटी माहिती माध्यमातून पसरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---