मंगळवार, सप्टेंबर 12, 2023

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अदांज ; ऑगस्ट महिन्यात कसा राहणार पाऊस? वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२३ । राज्यात जून महिन्यात सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र झोडपून काढलं. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली पहायला मिळाली. यामुळे शेती पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान आले असून अनेकांचा संसार उघड्यावर आले आहे. दरम्यान. जुलै महिन्यात धुमाकूळ घालणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात कसा राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा अदांज आहे.

राज्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस ब्रेक घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलैमधील दमदार हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सध्या झालेल्या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला असून खरीप हंगामातील पिके बहरली आहेत. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामाला वेग दिला आहे. मात्र राज्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस ब्रेक घेईल असा अंदाज वर्तविला आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावासाचा जोर कमी असणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.