---Advertisement---
वाणिज्य

महागाईचा झटका ; आता किती वाढणार तुमच्या कर्जाचा EMI , जाणून घ्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । देशात वाढती महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी आज बुधवारी पुन्हा रेपो दरात (Repo Rate) 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याची घोषणा केली. यानंतर रेपो दर 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के झाला. गेल्या महिनाभरात आरबीआयने रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. रेपो दर वाढीनंतर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि कार कर्जाच्या ईएमआय (EMI)मध्ये वाढ होणे जवळपास निश्चित आहे.

EMI jpg webp

कर्जाचा EMI वाढेल
आरबीआयने रेपो दरात केलेल्या बदलामुळे बँकांना कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे आगामी काळात तुमचे गृहकर्ज, कार लोन ईएमआय वाढेल. आरबीआयने आर्थिक आढावा धोरण जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सकाळी हिरव्या चिन्हाने उघडलेला शेअर बाजार सकाळी 10.30 वाजता 55 हजारांच्या खाली पोहोचला.

---Advertisement---

काय परिणाम होईल?
रेपो रेट वाढवण्याचा परिणाम तुमच्या गृहकर्ज, कार कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जावर होईल. जर तुमचे आधीच कर्ज चालू असेल किंवा तुम्ही कर्ज घेणार असाल तर येत्या काही दिवसांत बँकेकडून व्याजदर वाढल्यामुळे ईएमआय पूर्वीपेक्षा जास्त असेल. याचा परिणाम नवीन आणि जुन्या ग्राहकांवर होणार आहे. ते संख्यांमध्ये समजून घेऊ.

वर्षाला 11 हजारांचा बोजा वाढणार आहे
जर एखाद्या ग्राहकाने 20 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले असेल. आतापर्यंत तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर 7.20 टक्के असेल तर आता तो 7.70 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही 30 लाखांच्या कर्जावर सध्याच्या व्याज दराने 20 वर्षांसाठी 23,620 रुपये प्रति महिना EMI भरत आहात. परंतु व्याजदरात 0.50 टक्क्यांच्या वाढीमुळे हा EMI 24,536 रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेच दर महिन्याला ९१६ रुपये अधिक भरावे लागतील. त्यानुसार दरवर्षी सुमारे 10992 रुपये मोजावे लागणार आहेत.

रेपो दर म्हणजे काय?
RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना RBI कडून जास्त दराने कर्ज मिळेल. यामुळे गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादीवरील व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---