मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही नवीन कामाची योजना करू शकता. आज आपल्याला संतती आणि संपत्ती सौख्य चांगले आहे. पौर्णिमेची निगडित विशेष देवी उपासना करावी.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांचे रखडलेले कामे मार्गे लावू शकतात. व्यवसायात आर्थिक मदत मिळेल. अडकलेला पैसा मिळेल.
मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. व्यवसायामध्ये मात्र समाधानकारक स्थिती राहील. काही अडचणी येतील पण त्यावर मात कराल असा दिवस आहे.
कर्क – कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. आनंदास भरती येईल. व्यवसायामध्ये वाढ होईल. पैशाची आवाक चांगली असल्यामुळे दिवस चांगला राहील.
सिंह – आज होळी पौर्णिमा आहे. चांगला दिवस आहे. आपली उर्मी आणि ऊर्जा वाढणारा दिवस आहे. सातत्याने कार्यमग्न रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या – धर्माकडे कल ठेवावा लागेल. कारण परिस्थिती तशी निर्माण होईल. मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या वस्तू गाळ होणार नाहीत ना याची काळजी घ्या.
तूळ – होळी पौर्णिमेसारखा छान दिवस आहे. घरातील जवळच्या लोकांबरोबर आनंदात साजरा करा. मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृश्चिक – आपल्या कार्यक्षेत्रात आज आघाडीवर रहाल. सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये सहभागी होण्याचे योग आहेत. दिवस चांगला आहे.
धनु – गुरुकृपा म्हणजे काय हे आज जाणवेल. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाल. पौर्णिमेचा दिवस आहे दान ,दानत, उदारता आणि लक्ष्मी उपासना आज करावी.
मकर – कोणाचेही सहकार्याची आज अपेक्षा करून उपयोग नाही. वादविवाद टाळलेले बरे. नेहमीच्याच कामाला कंटाळाल.
कुंभ – भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभेल.मन आनंदी आणि आशावादी राहील. नवीन काहीतरी करण्याच्या जोमाने पेटून उठाल.
मीन – वेळ आणि पैसा वाया जाईल. हाती काहीच लागले नाही अशी ही दिवसाच्या शेवटी भावना होईल. मनोरंजनाकडे कल राहील. येते ते करा.