जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२५ । तुम्हीही होंडा कंपनीची नवीन बाईक घेण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. होंडाने नुकतीच एंट्री लेव्हल बाईक शाईन १००डीएक्स लाँन्च केलीय. ही बाईक अशा ग्राहकांसाठी बनवण्यात आली आहे ज्यांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी अधिक आकर्षकता आणि वैशिष्ट्यांची अपेक्षा आहे. ही बाईक थेट हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करणार आहे. दरम्यान, कंपनीने या बाईकची किंमतही जाहीर केली आहे. आपल्या किंमतीमुळे नवीन ग्राहकांना आकर्षित करू शकते. चला तर मग जाणून घेऊयात या बाईकमध्ये कोणत्या खास फीचर्स आहेत आणि तिची किंमत काय आहे? Honda Shine 100 DX

इंजिन कसं आहे?
होंडा शाईन १०० डीएक्स ९८.९८ सीसी सिंगल सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड ओबीडी२बी अनुरूप इंजिनने सुसज्ज आहे जे ५.४३ किलोवॅट आणि ८.०४ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहेत. विशेष म्हणजे यात एकत्रित ब्रेकिंग सिस्टम (CBS) आहे जे ड्रम ब्रेक असूनही प्रभावीशाली आहे. या बाईकमध्ये ९७.२ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे ७.९ बीएचपी पॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क देते, याशिवाय इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्ससह येते.

नवीन शाईन १००डीएक्समध्ये डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात तुम्हाला रिअल टाइम मायलेज आणि डिस्टेंस टू एम्प्टी यासारखे फीचर्स मिळतील. बाईकची डिझाईन चांगली आहे आणि तिची इंधन टाकी थोडी बोल्ड आहे. तिची एकूण क्षमता आता १० लिटर आहे. पूर्वी ती ९ लिटर होती. म्हणजेच ती १ लिटर जास्त पेट्रोल धरेल. बाईकची सीट मऊ आणि आरामदायी आहे. दैनंदिन वापरासाठी ही एक चांगला पर्याय ठरू शकते. होंडाची नवीन शाईन १००डीएक्स देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करेल,असं म्हटलं जात आहे.
किती आहे किंमत?
काळ्या, लाल, निळ्या आणि राखाडी या चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येते. हिरो स्प्लेंडर प्लसची किंमत ७९,००० रुपयांपासून सुरू होते.











