⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | होंडाने ‘ही’ नवी स्वस्त स्कूटर केली लॉन्च! किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या..

होंडाने ‘ही’ नवी स्वस्त स्कूटर केली लॉन्च! किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । तुम्ही जर होंडा (Honda) कंपनीची नवीन स्कुटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आहे. कारण होंडाने आज नवीन स्कूटर Honda Dio 125 लाँच केली आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये अनेक प्रगत फीचर्स समाविष्ट केले आहेत.आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत 83,400 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. Honda Dio 125 launched

आत्तापर्यंत, Honda Activa व्यतिरिक्त, ग्राहकांना आणखी एक शक्तिशाली स्कूटर निवडण्याची संधी मिळेल. कंपनीच्या पोर्टफोलिओमधील ही तिसरी स्कूटर आहे, जी 125cc इंजिनसह सादर करण्यात आली आहे, याआधी Activa आणि Grazia लाँच करण्यात आले होते.

Honda Dio 125 कंपनीने एकूण दोन प्रकारांमध्ये सादर केली आहे, त्याच्या मानक प्रकाराची किंमत 83,400 रुपये आणि स्मार्ट व्हेरिएंटची किंमत 91,300 रुपये आहे. कंपनीने या स्कूटरची बुकिंग आधीच सुरू केली आहे आणि लवकरच तिची डिलिव्हरीही सुरू होणार आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये
नवीन Honda Dio 125 मध्ये 123.97 cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन आहे जे 8.19 bhp पॉवर आणि 10.4 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. याशिवाय, स्पोर्टी एक्झॉस्ट नोटसाठी यात ड्युअल आउटलेट मफलर आहे. वैशिष्ट्ये म्हणून, स्कूटरला ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, होंडाची एच-स्मार्ट की, अलॉय व्हीलसह फ्रंट डिस्क ब्रेक, 18-लिटर-आसनाखालील स्टोरेज स्पेस आणि बरेच काही मिळते.

Dio 125 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर याला नवीन लोगो आणि ग्राफिक्ससह बोल्ड स्टाइलिंग देण्यात आले आहे. क्रोम कव्हरसह ड्युअल आउटलेट मफलर आणि स्पोर्टी एक्झॉस्ट नोट स्पोर्टी लुकमध्ये भर घालतात. याशिवाय, यात शार्प हेडलॅम्प आणि स्लीक पोझिशन लॅम्पसह स्पोर्टी फ्रंट, आधुनिक टेल लॅम्पसह शार्प रिअर डिझाइन आणि स्प्लिट ग्रॅब रेल आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.