क्या बात है ! Honda ही बाईक झाली तब्बल 50 हजार रुपयांनी स्वस्त
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२२ । तुम्ही जर नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Honda टू-व्हीलर्स इंडियाने त्यांच्या नवीन लाँच केलेल्या CB300F नेकेड स्ट्रीट फायटरवर वर्षअखेरीच्या उत्कृष्ट ऑफरची घोषणा केली आहे. Honda Big Bing डीलरशिप नवीन Honda CB300F वर 50,000 रुपयांची सूट देत आहे. नवीन Honda CB300F ऑगस्ट 2022 मध्ये लॉन्च करण्यात आली. डिलक्स आणि डिलक्स प्रो या दोन प्रकारांमध्ये ही मोटरसायकल ऑफर करण्यात आली होती.
या दोन्हीची किंमत अनुक्रमे 2.26 लाख आणि 2.29 लाख रुपये होती, परंतु आता 50,000 रुपयांच्या सवलतीसह किंमत कमी झाली आहे. यासह, नवीन Honda CB300F ची किंमत 1.76 लाख रुपये (Deluxe) आणि 1.79 लाख रुपये (Deluxe Pro) झाली आहे. किमतीतील कपातीमुळे नवीन Honda CB300F आता KTM Duke 125 आणि Bajaj Dominar 250 पेक्षा स्वस्त आहे. Duke 125 ची किंमत 1.78 लाख रुपये आणि Dominar 250 ची किंमत 1.75 लाख रुपये आहे.
नवीन Honda CB300F तीन रंग पर्यायांमध्ये येते – मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड. नवीन Honda CB300F पूर्ण एलईडी हेडलॅम्प, टर्न इंडिकेटर आणि एलईडी टेल-लाइट्ससह येते. यात पूर्ण-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल आहे. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल आणि अलॉय व्हील्स मिळतात.
नवीन Honda CB300F 293cc ऑइल-कूल्ड, 4-वाल्व्ह SOHC इंजिनसह येते, जे 7,500rpm वर 24bhp पॉवर आणि 5,500rpm वर 25.6Nm पीक टॉर्क जनरेट करते. असिस्ट स्लिपर क्लच आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोलसह इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
मोटारसायकलचे वजन 153 किलोग्रॅम आहे आणि तिचे ग्राउंड क्लीयरन्स 177 मिमी आहे. यात 17 इंचाची चाके आहेत. हे 110/70 सेक्शन फ्रंट आणि 150//60 सेक्शन रिअर टायरसह येते. यात ड्युअल-चॅनल एबीएस सिस्टमसह 276mm फ्रंट डिस्क आणि 220mm रियर डिस्क मिळते. सस्पेंशन सेटअपमध्ये गोल्डन USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक समाविष्ट आहे.