⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

घरफोडी करणाऱ्यांची टोळी जेरबंद, मेहूचा गुन्हा उघड

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । पारोळा तालुक्यातील मेहु टेहू येथील घरफोडी प्रकरणी, एलसीबीच्या पथकाने तीन जणांना अटक केली आहे. कृष्णा अभिमन वाघ (भिल), विशाल जगदीश पाटील व रोहीत सुनिल पाटील (तिन्ही रा. मेहु, ता. पारोळा) असे संशयितांचे नाव आहे. दरम्यान तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पारोळा पोलिस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांच्या पथकाने मेहू येथून संशयित कृष्णा अभिमन वाघ (भिल), विशाल जगदीश पाटील व रोहीत सुनिल पाटील (तिन्ही रा. मेहु, ता. पारोळा) यांची चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मेहु येथील योगेश चव्हाण यांच्या घराच्या किचनच्या खिडकीतून कृष्णा वाघ हा आत उतरला. घराला आतून लावलेली कडी उघडून त्याने दोन्ही साथीदारांना आत घेतले. घरातून १२ हजार रुपये रोख आणि विवो मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन पारोळा पोलिसांकडे सोपवले.