जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर या उच्चशिक्षित आहेत. उच्चशिक्षित महापौर जयश्रीताई महाजन यांचा आम्हाला अभिमान आहे. मात्र उच्चशिक्षित महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे चुकीची मागणी केली आहे. महापौरांनी अभ्यास करूनच मागणी करावी असा टोला जळगाव फर्स्ट चे समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाचे महानगर सरचिटणीस डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी लगावला.
यावेळी डॉक्टर राधेश्याम चौधरी म्हणाले की, डिसेंबर 2021 मध्ये 42 कोटींच्या कामांतर्गत नगर उत्थान अंतर्गत काव्यरत्नावली चौक ते डीमार्ट रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. महापौर जयश्री महाजन या महासभेच्या अध्यक्ष असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली हा रस्ता मंजूर झाला आहे. तरीही महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे या रस्त्यासाठीच अजून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्याची विनंती केली आहे. अशावेळी उच्चशिक्षित महापौरांचा अभ्यास कमी पडत आहे अशी टीका डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी केली आहे
तर दुसरीकडे डॉक्टर राधेश्याम चौधरी असेही म्हणाले की, अशी मागणी करताना महापौर जयश्री महाजन या विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत का ? असा प्रश्न हे उपस्थित करावासा वाटतो. याचबरोबर आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी प्रतिमा जळगाव शहर महानगरपालिकेची निर्माण झाली असताना महापौरांनी केलेली ही मागणी अतिशय चुकीची आहे.
मात्र जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कारभारा विरोधात विरोधी पक्षनेते यांनी आवाज उचलायला हवा. मात्र विरोधी पक्ष नेते हे त्यांचे काम व्यवस्थित करत नाहीत. असेही डॉ राधेश्याम चौधरी म्हणाले.