बातम्या
गोलाणीत हाय व्होल्टेज : टीव्ही, लाईट, ट्यूब, चार्जर, इलेकट्रीक वस्तू जळाल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । जळगाव जिल्ह्याच्या इलेक्टिक दुकानांची शान असलेले गोलाणी मार्केटमध्ये अचानक विजेचे व्होल्टेज वाढल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. यावेळी दुकानदारांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
सकाळी ११च्या सुमारास अचानक जळगाव शहरातील गोलाणी मार्केट मध्ये लाईटचे व्हॉलटेज वाढले. यामुळे बंद असलेले स्विच सुद्धा सुरु झाले. टीव्ही, लाईट, ट्यूब, चार्जर, इलेकट्रीक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. एका दुकानदाराचा टीव्ही सुद्धा जाळाला. जळगाव शहरातील गोलाणी मार्केट हे जिल्ह्यातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक मार्केट आहे. जिल्हातील सर्वच नागरिक येऊन याठिकाणी इलेकट्रॉनिक वस्तू विकत घेतात.
दुकानदारांनी तूर्तास संबंधित एम एस इ बी च्या कर्मचाऱ्यांना फोन करून संपर्क साधला मात्र त्यांच्याकडून कोणतीही मदत आली आहे.