⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | अरे बाप रे..! भरदिवसा दोन घरांमध्ये चोरी, सात लाखांचा ऐवज लांबवला

अरे बाप रे..! भरदिवसा दोन घरांमध्ये चोरी, सात लाखांचा ऐवज लांबवला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । पारोळा येथील जगमोहननगर आणि वर्धमान नगरातील दो उच्चभ्रू वसाहतीत दोन घरे चोरट्यांनी ५ रोजी दुपारी ३ ते ५ वेळेदरम्यान भरदिवसा फोडली. दोन्ही घरांमधून ६ ते ७ लाखांचा ऐवज चोरांनी लांबवल्याचे उघडीच आले आहे.

जगमोहनदास नगरातील रहिवासी तथा जिल्हा बँक कर्मचारी रवींद्र पाटील हे सकाळी नेहमीप्रमाणे बँकेत गेले होते. तर त्यांच्या पत्नी सुनीता पाटील एन.ई.एस.हायस्कूलमध्ये कार्यरत असल्याने दुपारी ३ वाजता त्या शाळेत गेल्या होत्या. ५ वाजता त्या घरी परत आल्या तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच घरातील बेडरूममधील कपाटे फोडून त्यातील ५२ ग्रॅमची सोन्याची चेन तसेच २२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चांदीचा ग्लास व काही चांदीचे तुकडे असा चार लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले. दुसऱ्या घटनेत याच वसाहतीच्या पुढे उंदिरखेडा रस्त्यावरील वर्धमाननगरात चोरी झाली. मणिपूर येथे कार्यरत लष्करी जवान प्रकाश पाटील (मूळ रा. खोरदड, ता.धुळे) हे पत्नीसोबत ४ रोजी घराला कुलूप लावून पाचोरा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. ५ रोजी सायंकाळी ५ वाजता ते घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात पाहिले असता गोदरेज कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने, चांदीचे तुकडे असा किमान दीड ते दोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पाळत ठेवल्याचा संशय

विशेष म्हणजे दोन्ही वसाहतींमध्ये कायम वर्दळ असते. सर्व घरे एकमेकांना लागून आहेत, तरीही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरट्यांनी बंद घरांवर पाळत ठेऊन भर दुपारी आपले काम फत्ते केले. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, सहा.निरीक्षक नीलेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह