⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Hero ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, एका चार्जवर धावेल 165KM, जाणून घ्या किंमत?

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या महागाईने सर्वजण हैराण झाले आहेत. या वाढलेल्या किमती कधी खाली येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशा परिस्थितीत महागाईपासून दिलासा मिळावा म्हणून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. दरम्यान, अशातच आज शुक्रवारी Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च केली. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी – Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लॉन्च केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन प्रकारांमध्ये आणली गेली आहे. हिरोचा दावा आहे की इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सादर केले गेले आहे. यात टच स्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, कीलेस कंट्रोल आणि अॅलॉय व्हील यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

किंमत किती आहे
कंपनीने या दोन्ही स्कुटर 1.5 लाखांच्या रेंजमध्ये सादर केले आहे. कंपनीने Vida V1 Plus ची किंमत 1.45 लाख रुपये आणि V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये आहे. त्यांचे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ग्राहक ते 2499 रुपयांमध्ये बुक करू शकतात. स्कूटरची डिलिव्हरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. सुरुवातीला ही स्कूटर दिल्ली, बेंगळुरू आणि जयपूर या तीन शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात आणखी शहरे जोडली जातील. बुकिंगसाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात.

Vida V1 Pro
ही Vida V1 ची अधिक शक्तिशाली आवृत्ती आहे. ही स्कूटर एका फुल चार्जमध्ये 165 किमी अंतर कापते. स्कूटरचा टॉप स्पीड 80KM प्रति तास आहे. ते 3.2 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते.

Vida V1 Plus
ही Vida V1 ची कमी शक्तिशाली आवृत्ती आहे. ही स्कूटर फुल चार्जमध्ये 143 किमी अंतर कापते. स्कूटरचा टॉप स्पीड 80KM प्रति तास आहे. ते 3.4 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते.

Hero Vida V1: ७०% किमतीत बायबॅक
कंपनी ग्राहकांना Vida V1 साठी किमतीच्या 70% पर्यंत बायबॅक योजना ऑफर करणार आहे. याशिवाय ग्राहकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कंपनी ७२ तास किंवा ३ दिवसांसाठी टेस्ट राइड प्लॅन ऑफर करेल. Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी IP67 रेटिंग आहे. Vida V1 हा ‘स्मार्टफोन ऑन व्हील्स’ असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणजेच, तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट केल्यानंतर, ते डिस्प्लेवर सर्व आवश्यक माहिती दर्शवते.