Hero च्या बाईकच्या किंमतीत तिसऱ्यांदा झाली वाढ, आता ‘इतक्या’ रुपयांनी महागली
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । सध्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे. खाण्यापिण्यापासून ते दुचाकी चार चाकी गाड्यापर्यंतच्या किमती महागल्या आहे. दरम्यान, येत्या सणासुदीच्या काळात तुम्ही स्वत:साठी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला मोठा झटका बसू शकतो. कारण दुचाकी खरेदी करणाऱ्यांना आता जास्त किंमत मोजावी लागणार आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किमती गुरुवार 22 सप्टेंबर 2022 पासून लागू झाल्या आहेत.
स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये, Hero MotoCorp ने सांगितले की, वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे, ज्या प्रकारे खर्च वाढला आहे त्याप्रकारे दुचाकी वाहनांच्या निर्मितीचाही खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपनीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या किमतीत 1,000 रुपयांनी वाढ झाली आहे. हिरो मोटोकॉर्पने सांगितले की, मोटरसायकल स्कूटरची किंमत गुरुवारपासून वाढवली जात आहे. या किमतींमध्ये एक हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पण मॉडेल आणि मार्केटच्या आधारे निर्णय घेतला जाईल.
Hero MotoCorp ने 2022 मध्ये तिसऱ्यांदा किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी 1 जानेवारी 2022 पासून 2,000 रुपयांनी, नंतर 1 जुलैपासून 3,000 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता 22 सप्टेंबरपासून दरात 1000 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Hero Motocorp देखील इलेक्ट्रिक वाहन विभागात प्रवेश करणार आहे. पुढील महिन्यात कंपनी विडा ब्रँडच्या नावाने इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करणार आहे.