⁠ 
शनिवार, जून 22, 2024

थोरपाणी येथील त्या मयताच्या वारसाला तात्काळ मदत देण्याचे आदेश ; यावल राष्ट्रवादीच्या मागणीला प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२४ । यावल तालुक्यातील आंबापाणी येथील थोरपाणी आदिवासी पाड्यावर दि. २४ मे रोजी वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे या कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस यावल पक्षाने मागणी केली. त्या मागणीला प्रतिसाद देत तत्काळ तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांसह मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तात्काळ सूचना देऊन लवकरात लवकर त्या कुटुंबांना मदत मिळवून देण्याचे आदेश मंत्री अनिल पाटीलांनी दिली.

त्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून प्रत्येकी 4 लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी 1 लाख अशी एकूण 20 लाख रुपयांची मदत ही त्या पिडित कुटुंबियांच्या वारसांना देण्यासंबंधीत विभागांना दिले.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेस लागून असलेल्या मौजे आंबापाणी या अतिदुर्गम भागातील गावाजवळील थोरपाणी आदिवासी पाड्यावर 24 मे रोजी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच आदिवासी पावरा कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दु:खद घटना घडली होती. या घटनेनंतर सर्व स्तरातून राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले होते होते. त्यात यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा अंमळनेर येथे जाऊन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची अमळनेर येथे भेट घेऊन पीडीत कुटुंबाला लवकरात लवकर मदत देण्यासाठी विनंती केली.

याप्रसंगी यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲड.देवकांत बाजीराव पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राकेश पाटील, कोरपावलीचे सरपंच तथा सामाजिक आघाडी तालुका अध्यक्ष विलास अडकमोल, चुचाळे तेथील छत्रपती फाऊंडेशनचे संचालक विनोद पाटील, वरडसीम येथील ग्रा.प सदस्य विलास पाटील, राष्ट्रवादी भुसावळ माजी युवक अध्यक्ष अतुल चव्हाण आदींची त्या प्रसंगी उपस्थिती होती