⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गरीब कैद्यांना केली जाणार मदत – अर्थमंत्री निर्मला सीतारमन

गरीब कैद्यांना केली जाणार मदत – अर्थमंत्री निर्मला सीतारमन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२३ ।  गरीब कैद्यांना जामीन मिळवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली.

पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये ओळखपत्र म्हणून केला जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. याचबरोबर युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार, मशीनद्वारे मैला उचलला जाण्याची नवी योजना आणली जाणार आणि युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे त्या म्हणाल्या

 2023-24 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2023 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले. पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली.

हा अर्थसंकल्प देशाच्या अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षी भारतात देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांचा वाढला आहे. यातून मोठ्या रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. अशावेळी पर्यटन हे रोजगार बनले आहे.असे त्या म्हणाल्या

author avatar
टीम जळगाव लाईव्ह