---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मागणी !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. य़ामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय चौधरी, जिल्हाध्यक्ष भुपेश जाधव यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.

cotton rain jpg webp

रावेर तालुक्यात ६ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर ढगफूटी होवून अतिवृष्टी झाली होती. यात रावेर शहर, रसलपूर, शिंदखेडा, रंमजीपुर, खिरोदा प्र., रावेर भागात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान झाले होते. रावेर तालुक्यात वारंवार अतिवृष्टी व चक्रीवादळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. व त्यांच्या उभ्या पिकाची अपरिमित हानी होत आहे. साधारणतः दरवर्षीच शेतकऱ्यांना अशा संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी मोडून पडण्याची शक्यता आहे..

---Advertisement---

त्यातच रावेर तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने सातपुड्यातील सर्वच नद्यांना मोठा पूर आला. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून २० जनावरे वाहून गेलेले आहेत. तसेच तालुक्यातील रमजीपूर, रावेर, खिरोदा प्र.रावेर, रसलपूर, शिंदखेडा, मोरव्हाल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसून १४५ घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. दरम्यान, मयताच्या वारसांना तातडीने ५ लाख रूपयांची मदत

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---