⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात रिमझिम पाऊस ; जिल्ह्यातील प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ

जळगाव जिल्ह्यात रिमझिम पाऊस ; जिल्ह्यातील प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. त्यामुळे अनेक जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील काही दिवसापासून पावसाने अधून-मधून हजेरी लावत आहे. त्यामुळे खरीपाच्या दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

दरम्यान, काल बुधवारी शहरासह जिल्ह्यातभरात रिमझिम पाऊस चांगलाच रमला. दिवसभर ढगाळ आणि अधून-मधून पावसाच्या सरी सुरू होत्या. ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, हा पाऊस काही दिवस असाच रमणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्येही हळूहळू वाढ होत आहे. बुधवारपर्यंत वाघुरमध्ये तब्बल 63 टक्के जलसाठा झाला आहे.

जुन आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यापर्यंत जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीपाच्या दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.  गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणी झाली. या दमदार पाऊस झाल्याने खरीपाच्या दुबार पेरणीतील पीके उगवून आली आहेत. गेल्या चार दिवसात पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. 

मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. बुधवारी दिवसभर थोड्या-थोड्या अंतराने पावसाच्या सरी कोसळत होत्या. रविवारपर्यंत पावसाचा जोर असेल. सोमवारपासून जोर काहीसा कमी  असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, लघु आणि मध्य प्रकल्पात जलसाठा वाढत आहे. मोठ्या प्रकल्पात 37.9 टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये 42.62 टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये अवघा 7 टक्के इतका जलसाठा आहे.आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 33.85 टक्के जलसाठा आहे.तर गेल्या वर्षी याच  जिल्ह्यात 43 टक्के जलसाठा होता. हतनूरमध्ये  टक्के,वाघुरमध्ये 62.90 टक्के तर गिरणेत 37.25 टक्के इतका जलसाठा आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.