---Advertisement---
बातम्या

दोन दिवस मुसळधार : ७६६ हेक्टरला फटका, २२ गावातील दीड हजार शेतकऱ्यांचे नुकसान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री प्रचंड पाऊस झाला. या पावसावेळी विजांच्या कडकडाट झाला. जिल्ह्यातील सहा महसुली मंडळात तब्बल 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ७६६ हेक्टर वरील केळी कापूस मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात 22 गावे बाधित झाली आहेत. तर १ हजार ३३६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

farmer

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे सखल भागात पाणी साचले. कित्येक शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे पिकांना जीवदान मिळून फुलोरा लागण्याची स्थिती आगामी काळात होणार आहे. असे म्हटले जात आहे.

---Advertisement---

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे सखल भागात पाणी साचले. अनेक शेतात पाणी साचल्याने कापूस, केळी पिकांचे, सोयाबीनचे नुकसान झाले. दुसरीकडे पिकांना जीवदान मिळून पिकांना फुलोर लागण्याची स्थिती आगामी काळात होणार आहे. रविवारी एकूण सरासरी २५ मिलिमीटर पाऊस झाला. रावेरला ६० मिलिमीटर, जळगावला ५१.८ मिलिमीटर, भुसावळला ३६ मिलिमीटर, चोपडा ४९, मुक्ताईनगर तालुक्यात ४०.३ पाऊस झाला.

भोकर, धानोरा, अडावद या महसूल मंडळांत ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होऊन ढगफुटी झाली. तर अंतुर्ली, ऐनपूर, खिर्डी, पिंप्राळा, रावेर, सावदा महसूल मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---