जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेनंतर पडणार दमदार पाऊस

जून 14, 2021 6:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात अद्यापही मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. जूनचे १४ दिवस उलटले तरी पेरण्यायोग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस २० जूननंतरच येईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

rain

भारतीय हवामान विभागनं मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होईल, असं म्हटलं होते. मात्र, केरळात मान्सून  तीन दिवस उशिरा म्हणजे 3-४ जूनला दाखल झाला.  त्यानंतर मान्सून ने पुढील वाटचाल करत मुंबई, कोकण, विदर्भ, मध्य प्रदेशात मॉन्सून सक्रिय झाला. तेथे दमदार पाऊसही होत आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र सह उत्तर महाराष्ट्रात अजूनही मान्सूनने हजेरी लावली नाही. 

Advertisements

वातावरणातील बदलामुळे पाऊस २० जूननंतरच जळगाव जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सक्रिय होईल, असा अंदाज आहे. तोपर्यंत पावसाची वाट पाहावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशीच्या पेरण्या केल्या. मात्र कोरड वाहू शेतकऱ्यांनी वखरणीची कामे केली आहेत. चांगला पाऊस पडल्यानंतरच पेरण्याचे नियोजन शेतकऱ्यांचे आहे.

Advertisements

दरम्यान, मध्य प्रदेशात जोरदार मॉन्सून झाल्याने तापी नदीला पूर येऊन त्याचे पाणी हतनूर (ता. भुसावळ) धरणात जमा झाले. धरणाची पाणीपातळी वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडावे लागले आहेत. एकीकडे असे चित्र आणि दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात दमदार मॉन्सूनचे आगमन अद्याप झालेले नाही. हवामान रोज बदलते आहे. जोरदार वारे वाहत आहेत. 

यामुळे तापमानाचा पारा कमी होतो आहे. दुसरीकडे दुपारी असह्य उकाडाही होत आहे. तरीही आकाशात मॉन्सूनचे ढग दिसत नाही. तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे. वातावरणातील बदलामुळे पाऊस २० जूननंतरच जळगाव जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सक्रिय होईल, असा अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now