⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

अखेर जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस ; शेतकरी सुखावला

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२३ । गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पावसाने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकरीराजा सुखावला आहे. हवामान खात्याकडून राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करून जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्याला देखील आज गुरुवारी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज दुपारी जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.

जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने जुलै महिना कसा जाईल याची चिंता शेतकऱ्यांना चिंता होती. जुलै उजाडला तरी जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नव्हती. पावसाअभावी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होती. काही शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या अखेरी झालेल्या मध्यम पावसावर पेरण्या केल्या होत्या. मात्र पावसाने हुलावणी दिल्याने दुबार पेरण्याचं संकट उभं ठाकलं होते.

अखेर आज गुरुवारी दुपारी जळगाव जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.