जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4, 5 दिवसात महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. जळगाव जिल्ह्याला १४ सप्टेंबरला यलो अॅलर्ट दिला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.
भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
12 सप्टेंबर
हवामान विभागानं रविवारी रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला यलो अॅलर्ट दिला आहे.
13 सप्टेंबर
हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट दिला आहे.
14 सप्टेंबर
हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट दिला आहे.