⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | आजही जळगावसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अलर्ट ; हतनूरचे चार दरवाजे उघडले

आजही जळगावसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अलर्ट ; हतनूरचे चार दरवाजे उघडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२४ । बंगाल उपसागरात मान्सूनच्या पावसाला अनुकूल बदल झाल्यामुळे आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे. मागील दोन तीन दिवसापासून राज्यातील विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. यातच रविवारी रात्री जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, हवामान खात्याकडून आजही जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता. सुरुवातीच्या आठवड्यात दमदार बॅटिंग केल्यानंतर मान्सूनची चाल अचानक संथ झाली. परिणामी अनेक भागात पावसाची तूट राहिली. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने सुमारे दहा दिवसांची विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. काही ठिकाणी पेरण्या देखील खोळंबल्याचं दिसून आलं. आता अशातच राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत आहे.

आज उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १० जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मान्सूनने २३ जूनला संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला. दरम्यान, मान्सूनची बंगाल उपसागरीय शाखा सक्रिय झाल्यामुळे मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेला सुद्धा काहीशी ऊर्जितावस्था आली आहे. परिणामी २४ जूनपासून आठवडाभर खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा अंदाज सेवानिवृत्त ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला

दरम्यान, भुसावळ येथील हतनूर धरणाचे चार दरवाजे 0.5 उघडण्यात आले आहे. हातनूर धरणातून 4097 क्यूसेक्सने तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. धरणात 53.20% जलसाठा शिल्लक आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने हतनूर धरणात पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली. यामुळे चार दरवाजे उघडण्यात आले. हातनूर धरणातील पाणलोट क्षेत्रात 177 मिलिमीटर पाऊस ची नोंद करण्यात आली.

जळगांव जिल्हातील पर्जन्यमान आकडेवारी 24/6/2024
अमळनेर-3
बोदवड-0
भडगाव-11
भुसावळ-25.6
पाचोरा-2
पारोळा-
जामनेर-10
चोपडा-13
चाळीसगाव-4
रावेर-10
मुक्ताईनगर-0
धरणगाव-11
यावल-12.2
एरंडोल-7
जळगाव-52.4

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.