⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | उष्णतेची लाट ; तापमान @ ४६.४

उष्णतेची लाट ; तापमान @ ४६.४

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । २९ एप्रिल २०२२। जिल्ह्यभारत तापमानामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे. पुढील चार ते पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दि २९ रोजी भुसावळ सह जळगावच्या तापमानाची नोंद ४६.४ इतकी करण्यात आली आहे.

उत्तर भारतातून एकामागून एक उष्णतेच्या लाटा निर्माण होत असल्याने उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. तर राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील तापमानात वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती तीव्र झाली आहे. त्यामुळे आगामी दोन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानवाढ कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. राज्यासह जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढला आहे. बंगालच्या उपसागरामधून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी असून राज्यात निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कमाल तापमान सरासरीच्या पुढे जाऊन उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. कमी-अधिक प्रमाणात उष्णतेची लाट पुढील चार ते पाच दिवस कायम असून, तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी दिवसभरात भुसावळ, जळगाव, ४६.४, अमळनेर ४६, बोदवड ४३, भडगाव ४५, चोपडा, धरणगाव, फैजपूर, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव, यावल ४६, पारोळा ४५, पाचोरा ४४ आणि चाळीसगाव ४१ अंश असे तापमान नोंदवले गेले आहे. आगामी काळात देखील जळगाव जिल्ह्यात तापमान ४३ ते ४६ अंश दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांतून वर्तविली जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.