⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | सावद्यातील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुलमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

सावद्यातील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुलमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील गोदावरी सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुल जळगावच्या विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे करण्यात आली.

१ ते ५ ऑगस्ट दरम्यान आयोजित या शिबिरात कान नाक घसा तज्ञ डॉ. साईकेत बासू, डॉ.जान्हवी बनकर,दंतरोग, डॉ.प्रज्ञा निघोट, डॉ. आशा भोई, आकाश चौधरी बालरोग ओमश्री गुडे, डॉ. सयानी चक्रवर्ती, डॉ चैतन्य केलुस्कर,डॉ. कुशल ढाके, डॉ सई चमलवार आणि मेडिसिन विभागाचे तज्ञ डॉ. तेजस खैरनार, डॉ. हर्ष त्रीपाठी, डॉ. सचिन संगपवाड, डॉ. मोहीत वाघ, डॉ रिषभ पाटील यांनी विदयार्थ्यांची उंची, वजन,यासह तपासणी केली.

या तपासणीतून ज्या बालकांना पुढील उपचाराची गरज होती त्यांच्या पालकांना मार्गदर्शन देखिल करण्यात आले तसेच लहान बालकांच्या विविध आरोग्य समस्याबाबत देखिल तज्ञांनी मार्गदर्शन केले. स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांनी पालकांना संबोधित करतांना शिक्षणाबरोबर निरामय आरोग्य हा बालकांचा हक्‍क असून पालकांसोबत शाळा प्रशासनही याबाबत दरवर्षी आरोग्य तपासणी उपक्रम राबवून साथ देत आहे असे सांगितले. यावेळी जवळपास १००० च्या वर विदयार्थ्यांची तपासणी करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उत्सुकतेने पालकांनी देखिल तपासणी करून घेत या उपक्रमाचे कौतुक केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.