जळगाव जिल्हा

ज्येष्ठ नागरिकांचे 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान आरोग्य तपासणी शिबीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२४ । “मुख्यमंत्री वयोश्री योजना” अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी जळगांव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक यांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान करण्यांत आलेले आहे तरी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

महापालिका क्षेत्रासाठी :- अधिष्ठाता, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, जळगाव, जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव, राजश्री छत्रपती शाहु महाराज रुग्णालय, शाहुनगर जळगाव येथे 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान तपासणी होणार आहे.
ग्रामीण क्षेत्रासाठी :- जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, तसेच वैद्यकीयअधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव येथे 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान तपासणी होणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना नेमकी काय आहे?
राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय साधने/उपकरणे खदेरी करण्याकरिता तसेच मानसिक स्वास्थ्य केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना रावविण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास मान्यता देण्यांत आली आहे.

योजनेचे स्वरूप- या योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/दुर्बलतेनुसार सहायभूत साधने/उपकरणे खेरेदी करता येतील. (उदा श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ.)

योजनेचा लाभ घ्यावयासाठी आवश्यक कागदपत्रे १. आधारकार्ड/मतदान कार्ड, २. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, ३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो, ३. दोन प्रकारचे स्वयंघोषणा पत्र (उत्पंन्ना बाबत व दुबार लाभ),४. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जळगांव जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक यांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन खालील प्रमाणे करण्यांत आलेले आहे तरी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यांत येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button