भुसावळातील गोल्डन अवर रुग्णालयात 19 व 20 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सप्टेंबर 18, 2025 7:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर रुग्णालयात 19 व 20 सप्टेंबरदरम्यान दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, सकारात्मक व निरोगी आयुष्य जगण्यावर डॉ.सांतनू कुमार साहू यांचा भव्य सेमिनार रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 8.30 दरम्यान शहरातील सिंधी कॉलनीतील संत कंवरराम चौकातील बडा सेवा मंडलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

shibir 3 jpg webp

दोन दिवस मोफत तपासणी शिबिर

शहरातील गोल्डन अवर रुग्णालयात 19 व 20 सप्टेंबर रोजी दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात रक्तदाब (बी.पी.), डायबीटीस (शुगर), कार्डीओग्राम (ईसीजी) अगदी मोफत काढण्यात येणार असून तज्ज्ञ डॉक्टर कॉन्सीलिंग (आरोग्यावर समुपदेशन) करणार आहेत.

Advertisements

धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने सर्व वयोगटातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Advertisements

आनंदी जीवन जगण्यावर 21 रोजी सेमिनार

दरम्यान, सकारात्मक व निरोगी आयुष्य कसे जगावे ? या संदर्भात गोल्डन अवर रुग्णालयाचे डॉ.सांतनू कुमार साहू यांचा भव्य सेमिनार रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते 8.30 दरम्यान शहरातील सिंधी कॉलनीतील संत कंवरराम चौकातील बडा सेवा मंडलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सेमिनारमध्ये सहभागासाठी रजिस्टे्रशन आवश्यक असून अधिक माहितीसाठी ( मो.77739-44435, मो.77739-44425) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now