---Advertisement---
गुन्हे पारोळा

चारचाकी अडवून मोबाईलसह रोकड लुटला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । चारचाकी अडवून मोबाईलसह रोकड लुटल्याची घटना दि. ८ रोजी पारोळा येथे घडली. या प्रकरणी पारोळा पोलिसांत अनोळखी भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 10T095510.987 jpg webp

पारोळा तालुक्यातील मंदाने येथील रहिवासी अमोल दगडू पाटील (वय ४०) हे दि. ८ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पारोळा येथून त्यांच्या गावी मंदाने येथे (क्र.एचएच १४ ए.इ ४३१७) कारने हिचेने नॅशनल हायवे क्र.६ जात असताना सत्यनारायण मंदिराजवळ अनोळखी तीन भामट्याने त्यांची गाडी अडवली व हातातील लाकडी दांड्याचा धाक दाखवून १० हजार रु. किमतीचा मोबाईल, १,२६० रु. रोकड जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी पाटील यांनी दि. ९ रोजी पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्ध भादवी कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास सनोपी, रवींद्र बागुल करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---