⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | गुन्हे | अनोळखी व्यक्तींना पत्ता सांगणे पडले महागात; पुढे घडले असे काही..

अनोळखी व्यक्तींना पत्ता सांगणे पडले महागात; पुढे घडले असे काही..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३। अनोळखी लोकांना कोणतीही मदत करणे सध्या धोकादायक ठरतं आहे. अशातच एका ६२ वर्षीय व्यक्तीला अनोळखी लोकांना पत्ता सांगणे महागात पडले आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी गळ्यातील सोन्याची चैन ओढून नेली.

धुळे येथील देवपुरतील रामनगरात सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास बळवंत गणपत बैसाणे (वय ६२) यांच्यासोबत ही घटना घडली. या वृद्धाने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बळवंत बैसाणे हे बँक ऑफ बडोदा येथून सेवानिवृत्त झालेले आहे. नेहमीप्रमाणे घराबाहेर उभे असताना दोन जण पत्ता विचारण्यासाठी त्यांच्याकडे आले. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली.

त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न देखील केला. पण तो पर्यंत चोरटे पसार झाले होते. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघांची छबी टिपली गेली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह