HDFC ग्राहकांना मोठा झटका ; कर्जावरील व्याजरात वाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२२ । तुम्ही जर देशातील क्रमांक एक खासगी बँक HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना एक झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, HDFC बँकेने सर्व कर्ज कालावधीसाठी निधी आधारित कर्ज दर (MCLR) 5-10 बेस पॉइंट्स (bps) ने वाढवला आहे.
HDFC ग्राहकांना मोठा झटका :
ही वाढ 8 ऑगस्ट 2022 पासून लागू झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्स (0.50 टक्के) वाढ जाहीर केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये आरबीआयच्या एमपीसीच्या बैठकीत महागाई नियंत्रित करण्याच्या उद्देशाने असा निर्णय घेण्यात आला होता.
RBI ने रेपो दरात वाढ केली :
महत्त्वपूर्ण म्हणजे, केंद्रीय बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी, 5 ऑगस्ट रोजी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत (RBI MPC मीटिंग टुडे) निकाल देताना रेपो दरात 0.50 टक्के वाढीची घोषणा केली. या वाढीनंतर रेपो दर 5.40 टक्के झाला. या वर्षी RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट वाढवला आहे.
एका वर्षात रेपो रेट तीन वेळा वाढला :
यापूर्वी मे 2022 मध्ये आरबीआयने अचानक रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर, जून 2022 च्या एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. अशाप्रकारे मे महिन्यापासून रेपो दरात एकूण १.४० टक्के वाढ झाली आहे. या वाढीमुळे तुमचे गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज म्हणजेच बँकेकडून घेतलेली सर्व प्रकारची कर्जे महाग होतील.