⁠ 
शनिवार, मे 4, 2024

उद्यापासून बसणार खिशाला झळ? 1 मार्चपासून कोणते नियम बदलणार, जाणून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ फेब्रुवारी २०२४ । दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला काहीना काही बदल होत असतात. त्याच प्रमाण उद्यापासून मार्च महिन्याला सुरवात होणार महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक नियम बदलणार आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. १ मार्चपासून नेमके कोणते नियम बदलतील जाणून घेऊया.

एलपीजी- सीएनजीच्या किमती
एलपीजी-सीएनजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला बदलतात. मागच्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाहीये. परंतु, देशात वाढणाऱ्या महागाईमुळे अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अधिकचे पैसे मोजावे लागतील.

क्रेडिट कार्ड
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्रेडिट कार्डचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम १५ मार्चपासून बदलण्यात येईल. सध्या ही माहिती बँक ई-मेलद्वारे ग्राहकांना देत आहेत.

जीएसटीचे नवीन नियम
केंद्र सरकार जीएसटी नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. आता ५ कोटींहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ई-इनव्हॉसशिवाय ई-वे बिल तयार करता येणार नाहीये. हा नियम १ मार्चपासून लागू करण्यात येईल.

फास्टॅग
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)फास्टॅगचे केवायसी अपडेट करण्यासाठी २९ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत केवायसी अपडेट केले नाही तर बंद करण्यात येईल.