⁠ 
सोमवार, मे 20, 2024

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी पुन्हा खुशखबर.. ‘हा’ मोठा बदल आजपासून ग्राहकांसाठी लागू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । तुमचे जर HDFC बँक मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी पुन्हा एक खुशखबर आहे. कारण खासगी क्षेत्रातील आघाडीची HDFC मुदत ठेवीच्या (एफडी दर) दरात पुन्हा बदल केला आहे. नवे दर 20 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. नवीन दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर लागू होतील.

हा आहे नवा व्याजदर
बँकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना ७ ते २९ दिवसांच्या एफडीवर २.५० टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय बँक 30 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3% व्याज देत आहे. नवीन बदलानंतर, HDFC बँक 91 दिवस ते 6 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 3.50 व्याज देत आहे.

कमाल व्याज दर 5.60 टक्के
बँकेच्या वेबसाइटनुसार, एका दिवसापासून ते दोन वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 5.10 टक्के दराने व्याज दिले जाईल. दोन वर्षे 1 दिवस तीन वर्षांच्या FD वर 5.20 टक्के व्याजदर आहे. त्याच वेळी, तीन वर्षे 1 दिवस ते पाच वर्षांच्या FD वर 5.45 टक्के व्याजदर आणि पाच वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 5.60 टक्के व्याजदर मिळेल.

FD व्याज दर 20 एप्रिलपासून लागू

7 ते 14 दिवस: 2.50%
15 ते 29 दिवस : 2.50%
30 ते 45 दिवस: 3%
61 ते 90 दिवस: 3%
91 दिवस ते 6 महिने: 3.5%
6 महिने 1 दिवस ते 9 महिने: 4.4%
9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष : 4.40%
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे : 5.10%
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे : 5.20%
3 वर्षे ते 1 दिवस 5 वर्षे : 5.45%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे : 5.60%