एच.सी.जी.मानवता कॅन्सर सेंटर देणार जळगावात सेवा
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । उत्तर महाराष्ट्रातील एच.सी.जी.मानवता कॅन्सर सेंटर आता जळगावील रुग्णांना देखील आरोग्यसेवा देण्यास सज्ज झाले आहे. या सेंटरची ओपीडी क्लिनिक शाह डायग्नोस्टिक्स, गोविंद रिक्षा स्टॉपजवळ, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, पहिला मजला येथे सुरू करण्यात आले आहे. कॅन्सर तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या महिन्यात शनिवार ९ ऑक्टोबर २०२१ रोजा ओपीडी सुरू असेल.
बोन मॅरो ड्रान्सप्लान्ट व रक्ताचा कर्करोग, शरीरावरील गाठ, बरी न होणारी जखम, मासिक पाळी व्यतिरिक्त किंवा शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होत असल्यास, आवाजात बदल झाल्यास, खोकल्यावाटे रक्त येत असल्यास गिळायला त्रास होत असल्यास, सतत अपचन, भूक न लागणे वजन कमी होणे यासारख्या शारीरिक समस्यांनीग्रस्त रुग्णांनी संपर्क साधावा, असे आवाहन डेप्युटी मॅनेजर राहुल सूर्यवंशी (मो. ८६६८७६६९२८) यांच्याशी संपर्क करावा.