जळगावात जोरदार पाऊस.. हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले

ऑगस्ट 17, 2025 10:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२५ । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस नसल्याने गेल्या काही दिवसापूर्वी धरणाचे केवळ दोन ते चार दरवाजे उघडे होते. मात्र आता पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस अवाक वाढलयने हतनूर धरणाचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. आज रविवारी सकाळी हतनूर धरणाचे १४ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले.

hatnur dam

दरम्यान मागच्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केला असून मागच्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक वाढली आहे. यामुळे आज रविवारी सकाळी हतनूर धरणाचे १४ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आल्यामुळे तापी नदी पात्रात २८ हजार १७५ क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. यामुळे तापी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, हतनूर धरणात द्वार परिचालन व पूर नियंत्रण नियमांनुसार १० ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के साठा केला जातो. यंदा देखील हा साठा होईल. दरम्यान, सध्या धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे तापीचे पात्र खळाळले आहे. हे पाणी पुढे शेळगाव बॅरेजमध्ये येते. तेथून पुढे विसर्ग केला जातो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now