⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आजची सर्वात मोठी राजकीय बातमी : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाची छापेमारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । आजची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आलीय. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांच्या कागलमधील घरावर ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाचे 20 अधिकारी आज पहाटे 6.30 वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. तसेच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Hasan Mushrif House Raids by ED and Income Tax Department

सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. यासाठी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या ऑफिसमध्ये गेले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते आहे.

एखाद्या बड्या नेत्याच्या घरी आयकर विभाग आणि ईडीने छापेमारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीनंतर मुश्रफ समर्थकांनी मुश्रफ यांच्या घराबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.