जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२४ । जळगाव शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने टाकलेल्या छप्पेमारीत सुमारे २ लाख १९ हजार ६५० रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, तंबाखू, गुटखा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत असे की जळगाव शहरातील गुरुदेव नगरातील एका मयंक ऑटो गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीर रित्या प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि गुटखा असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकाला मिळाली. त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी त्यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीसांच्या मदतीने सोमवारी २४ जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला.
दरम्यान गोडावूनमध्ये अवैधपणे प्रतिबंधित असलेला गुटखा पानमसाला आणि तंबाखू आढळून आला. या ठिकाणी जवळपास २ लाख १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोडाऊन मालक अरुण पाटील रा. गुरुदेव नगर, जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २५ जून रोजी मध्यरात्री २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.