---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

गुन्हे शाखेने रोखली गुटखा तस्करी : 46 लाखांचा गुटखा जप्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुन २०२३ । राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची आयशर वाहनातून तस्करी होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकास कारवाई करीत 46 लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला. ही कारवाई नरडाणा पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल अन्नपूर्णाजवळ मंगळवार, 6 जून रोजी पहाटे करण्यात आली. या प्रकरणी सदाशीव रामचंद्र राठोड (35, महू, ता.महु, जि. इंदोर, मध्यप्रदेश) व क्लिनर सिकंदर कैलास सोनगरा (45, हरसोला, ता.महू, जि.इंदोर) यांना अटक करण्यात आली.

तस्करी jpg webp webp

धुळे गुन्हे शाखेला गुटखा तस्करीबाबत टीप मिळाल्यानंतर पथकाने नरडाणा पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी मध्यरात्री सापळा रचला. इंदौरकडून पुण्याकडे भरधाव वेगाने येत असलेला आयशर (एम.एच.18 बी.जी.3302) आल्याने त्याची झडती घेतली असता त्यात गुटखा आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले तर दोघांना अटक करण्यात आली. वाहनातून आरएमडी पानमसाला, तंबाखू, रजनीगंधा, विमल, राजश्री पानमसाला, खैनी तसेच परचुटन माल व 15 लाखांचे आयशर वाहन असा एकूण 43 लाख 67 हजार 118 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

---Advertisement---

ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, कमलेश सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, राहुल गिरी, मयूर पाटील, तुषार पारधी, योगेश साळवे आदींच्या पथकाने केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---