⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | चोपड्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त ; तीन आरोपींना अटक

चोपड्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त ; तीन आरोपींना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२१ ।  चोपडा शहरात व तालुक्यात गुटखा माफियांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतांना दिसून येत आहे. चोपड्यात दररोज सरासरी वीस लाख रुपयांचा गुटखा छुप्या मार्गाने येत असल्याचे बोलले जात आहे. गुटख्याची तष्करी वाढतांना दिसून येत आहे .त्या अनुषंगाने चोपडा शहर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले असून त्यात रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात साडे चार लाख रुपयांचा गुटखा सोबत तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत असे की,  पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दिनांक १७ व दिनांक १८ रोजी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांची टीम रात्री गस्त करीत असताना मिळालेल्या गुप्त  बातमीप्रमाणे चोपडा शहरातील पाटीलगढी भागात छापा टाकला असता रमाकांत बाबुराव मराठे यांच्या कब्जात एक्यानव  हजार पाचशे वीस रुपये किमतीच्या विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली.

त्याने दिलेल्या माहितीवरून मुख्य आरोपी राहुल विश्वास गुजराथी (गुजराथी गल्ली चोपडा) यास ताब्यात घेण्यात आले आहे . व दोन्ही आरोपींवर चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग पाच गुरन  १८८/ २०२१ भादवि कलम ३२८ , २७२ , २७३  प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे . अटके दरम्यान मुख्य आरोपी राहुल गुजराथी  याने दिलेल्या माहितीच्या आधारे मच्छी मार्केटमध्ये उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकप वाहन क्रमांक एम एच १९-५३८७ ताब्यात घेण्यात आली असता त्यात तब्बल एकवीस प्रकारच्या पानमसाला व सुगंधी तंबाखू असा एकूण तीन लाख अठ्ठावन  हजार एकशे पन्नास  रुपये किमतीच्या माल  व चार लाख रुपये किमतीची पिकअप वाहन  व चालक श्याम बडगुजर मिळून आला.

सदर आरोपी यास विचारपूस केली असता त्याने सदर माल  राहुल गुजराथी  याच्या असल्याबाबत सांगितले . नमूद गुन्ह्यातील  चार लाख एकोणपन्नास  हजार चारशे रुपये किमतीचा गुटखा व चार लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच १९ –  ५३८७ असे एकूण आठ लाख एकोणपन्नास हजार चारशे  रुपये किमतीचा मुद्देमाल व तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे . सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण,अंबादास सैंदाणे, विलेश सोनवणे, संतोष पारधी, प्रदीप राजपूत, ज्ञानेश्वर जवागे, शेषराव तोरे, वेलचंद पवार ,रत्नमाला शिरसाट, संदीप भोई, रवींद्र पाटील यांनी केली. सदर गुन्ह्याचा  पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पो ना  शेषराव तोरे करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.