⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

गुलाबरावांनी केलेलं ‘ते’ विधान खरं ठरणार? : भविष्यात राजकीय धक्का बसणार?

जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | महाराष्ट्रात शिवसेनेत बंड झाल्यावर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर खऱ्या अर्थाने ज्या भाषणाने शिंदे समर्थकांच्या अंगात ‘जान’ आणली हे भाषण म्हणजे गुलाबराव पाटील यांचं विधानसभेतलं भाषण. गुलाबराव पाटील यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली होती. यावेळी त्यांचं भाषण संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजलं होतं. आणि त्याच भाषणातला मजकूर येत्या काळात खरा ठरतो की काय? हे पाहणं आता उत्सुकतेची बाब बनल आहे.(future of gulabrao patil in jalgaon )

विधानसभेत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले होते की, आम्ही किती मोठी रिस्क घेतली आहे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही शिवसेनेत उठाव केला आहे. यामुळे आमचीच माणसं आमच्या विरोधात गेली आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत आमचं वैर कायम आहे. आणि अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाशी संघर्ष केल्यामुळे त्यातही आमचे काही वैरी निर्माण झाले आहेत. तरीदेखील आम्ही इतका मोठा उठाव केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी केला आहे.

गुलाबरावांच्या या वाक्यामुळे त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदेंची भूमिका बरोबर आहे! असा संदेश गेला. मात्र त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांनी घेतलेली ही रिस्क येत्या काळात महाग पडते की काय? हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे.

याचं कारण म्हणजे गुलाबराव पाटील यांचे एककाचे कट्टर समर्थक गुलाबराव वाघ हे आता ठाकरे गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कद्दावर नेते गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात तंबू ठोकला आहे. तिसर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘ज्यांनी भारतीय जनता पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला अशांसोबत युती नकोच’ असा पावित्रा जळगाव ग्रामीण मधल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे आता गुलाबराव पाटील यांचे पुढे काय होणार? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.(gulabrao patil vs gulabrao devkar)

ज्यावेळेस महाराष्ट्रात बंड झालं त्या वेळेपासून गुलाबराव वाघ विरुद्ध गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर अशी लढत जळगाव ग्रामीणमध्ये पाहायला मिळत होती. मात्र गुलाबराव पाटील यांना भारतीय जनता पक्ष सर्वतोपरी मदत करणार असे चित्र दिसून येत होते. मात्र जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या जळगाव ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवल्यामुळे आता भारतीय जनता पक्ष ही गुलाबराव पाटील यांना ऐन निवडणुकीत एकटं पाडले अशी चर्चा रंगू लागली आहे.(bjp vs shinde in jalgaon )

यामुळे आता निवडणुकीत नक्की काय होतं? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे. कारण जर हिंदुत्वासाठी गुलाबराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं आहे आणि हिंदुत्वाला बाजूला ठेवत जर भारतीय जनता पक्षाने गुलाबराव पाटलान विरुद्ध जायचा विचार केला तर येत्या काळात गुलाबराव पाटील यांचे राजकीय भवितव्य अतिशय कठीण असेल हे आता काही सांगण्याची गरज नाही.

मात्र गुलाबराव पाटील यांच्या सारख्या मातब्बर नेत्यासाठी अशी कितीही आव्हान आली तरी ते अशी आव्हाने पेलतील आणि भारतीय जनता पक्षच काय तर समोर सर्व पक्ष एकत्र झाले तरीही तेच निवडून येतील असाही विश्वास गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळत आहे. गुलाबरावांनी हिंदुत्वासाठी घेतलेला निर्णय त्यांना महागात पडणार? की ते घातलेल्या रिस्क शकट पुन्हा मैदानात घवघवीत यश मिळणार? हे आता येणारा काळच ठरवेल