⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024
Home | बातम्या | गुलाबराव पाटील जळगावात तर गिरीश महाजन नाशिक मध्ये करणार ध्वजारोहण

गुलाबराव पाटील जळगावात तर गिरीश महाजन नाशिक मध्ये करणार ध्वजारोहण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । एकनाथ शिंदे सरकारने अद्याप पालकमंत्री नेमले नसल्याने जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वातंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले जाते.

मंत्र्यांना अद्याप जिल्ह्यांचे वाटप झाले नसल्याने कोणता मंत्री 15 ऑगस्टच्या दिवशी कोठे जाणार, याची उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री असल्याने इतर सोळा जिल्ह्यांत विभागीय आयुक्त किंवा संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

बहुतांश नेत्यांना आपापले जिल्हे दिले आहेत. आता जे मंत्री ध्वजारोहणासाठी येतील तेच पालकमंत्री त्या जिल्ह्याचे राहतील का, याची उत्सुकता आहे. सर्वाधिक उत्सुकता ही पुण्याची आहे. कारण पुण्याचे पालकमंत्रीपद खुद्द देवेंद्र फडणवीस स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. तसे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिले होते. प्रत्यक्षात फडणवीस हे नागपूर येथेच ध्वजारोहण करणार आहेत. पाटील यांच्याकडे पुण्याची जबाबदारी आहे.

देवेंद्र फडणवीस- नागपूर

सुधीर मुनगंटिवार-चंद्रपूर

चंद्रकांत पाटील-पुणे

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर

गिरीश महाजन- नाशिक

दादा भुसे – धुळे

गुलाबराव पाटील- जळगाव

रवींद्र चव्हाण-ठाणे

मंगलप्रभात लोढा-मुंबई उपनगर

दीपक केसरकर-सिंधुदुर्ग

उदय सामंत-रत्नागिरी

अतुल सावे-परभणी

संदिपान भुमरे-औरंगाबाद

सुरेश खाडे-सांगली

विजयकुमार गावित-नंदुरबार

तानाजी सावंत-उस्मानाबाद

शंभूराज देसाई सातारा

अब्दुल सत्तार-जालना

संजय राठोड-यवतमाळ

अमरावती येथे विभागीय आयुक्त

कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर, नांदेड या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह