जळगाव शहर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ ।  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज मुक्ताईनगर तालुका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर होत असलेल्या उपचारांची माहिती आरोग्य यंत्रणेकडे घेतली. तसेच रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागास दिल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार चंद्रकांत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर रुग्णांवर आवश्यक ते उपचार  शासकीय रुग्णालयातच उपलब्ध होतील याचे नियोजन यंत्रणेने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button