गुलाबराव पाटलांचे चक्क अभिनेत्‍यांना ओपन चॅलेंज, म्हणाले..

फेब्रुवारी 8, 2023 5:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२३ । शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे नेहमी आपल्या बेधडक भाषणाने नेहमी चर्चेत असतात. अशातच सातारा येथील विविध पाणीपुरवठा योजनांचा ई भूमिपूजन सोहळा या कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाबराव पाटील यांनी तुफान फटके बाजी केली.

gulabrao patil 12 jpg webp

नेमकं काय बोलले?
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही लग्नात गेलो तर हसतो, मयतीत गेलो तर रडल्यासारखं करतो. वाढदिवसाला गेलो तर हॅपी बर्थ डे म्हणतो हा रोल काही साधा नाही. चांगल्या चांगल्या ॲक्टरांनी आमच्यासारखी ॲक्टिंग करून दाखवावी; असे ओपन चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्‍यांना दिले आहे.

माझ्याकडे पाणी पुरवठा खाते असल्याने आज कोणताही आमदार मला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही. आम्ही माणसात राहून मानसाळलेली माणसे आहोत. त्यामुळे सकाळी ५–२५ माणसे कमी आली की असे वाटतं हवा कमी झाली का काय? आमची ओपिडी चालली पाहिजे. आम्ही तर बदनाम जात आहे. पुढारी म्हणजे बदनाम जात.

मी १८२ साली पानटपरी चालवत होतो. तेव्हा हे पोलिस लोक मला पकडायला मागे पुढे असायचे. गणपती, दसरा काही असलं की पोलिस आलेच. पण आता बर वाटतं आगे गाडी, पीछे गाडी बीच मै बैठा गुलाबराव. असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now