जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला. राऊतांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना टोल लगावला आहे. संजय राऊत हा महालोफर माणूस आहे. त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यावे या मताचा असल्याचे मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

जळगाव येथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमाशी बोलताना संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे व नरेंद्र मोदी यांच्या संबंधाविषयी देखील मंत्री पाटील यांनी मत व्यक्त केले. बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे, बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक वेगळं नातं आहे. बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं, मोदी गया तो गुजरात गया.
संजय राऊत त्यावेळेस पत्रकार होते, संपादक होते. त्यांना भाजपमध्ये काय चाललं ते माहीत नव्हतं. मात्र आता हा भाऊ एकटाच तिकडे राहिला आहे, त्यामुळे ते बोलत आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेना अजून संपलेली नाही. कारण आम्ही कार्यकर्ते आजही जिवंत आहोत; असेही पाटील यांनी स्पष्ट केले.