---Advertisement---
बातम्या जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी : काल मुख्यमंत्र्यांसोबत असलेले जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल

gulabrao-patil-not-reachable
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । राज्यच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जवळपास ४० आमदार घेऊन बाहेर पडले आहे. एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु असला तरी अद्याप ते समजून घेतील असे कोणतेही चित्र दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल दिसत असलेले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल झाल्याचे वृत्त टीव्ही ९ या वाहिनीने दिले आहे. (Gulabrao Patil Not Reachable)

gulabrao-patil-not-reachable

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले होते. पक्षप्रमुख मनावर घेत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी ज्वलप्स ४० आमदार आणि मंत्र्यांचा मोठा गट फोडत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३० पेक्षा अधिक आमदारांचा फोटो आणि व्हिडीओ आज सकाळी व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा : Eknath Shinde Updates : जळगावातील शिवसेनेचा शेवटचा आमदार देखील फुटला!

---Advertisement---

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काही मंत्री आणि आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे वृत्त सकाळपासून समोर येत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे वृत्त काल प्रकाशित होत होते, परंतु जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत खात्री केली असता तसे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले होते. दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील दिसून आले होते.

दरम्यान, आज पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील नॉट रिचेबल झाल्याचे वृत्तसमोर येत असून टीव्ही ९ ने तसे वृत्त दिले आहे. मुंबईहून जळगावच्या दिशेने निघालेले जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील नॉट रिचेबल झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जळगावसह राज्यात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---