जळगाव शहरराजकारण

शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युतीवर ; मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.दरम्यान, शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत ( Sambhaji Brigade ) केलेल्या युतीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं आहे. ‘प्रत्येक पक्ष हा आपल्या परीने युती करण्याचा प्रयत्न करतोय मात्र शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेल्या युतीमुळे शिंदे सरकारला याचा काहीही फरक पडणार नाही’असंही गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

‘विरोध करणे हे विरोधकांचे काम असून एकनाथ शिंदे सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसह ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास यासारखे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले असून आगामी दोन वर्षात प्रलंबित कामे देखील शिंदे सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कितीही टीका केली मात्र जो काम करतो त्यालाच जनता नमस्कार करते, असा चिमटा ही गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना काढला आहे.

‘प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसाच प्रयत्न राज ठाकरे देखील करत आहेत. मात्र यामुळे कोणाचा नफा किंवा नुकसान होईल हे सांगता येत नाही. शेवटी कोणाचे डोके जास्त निवडून येतात यालाच महत्त्व असून आम्ही डोके निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, घोडा मैदान दूर नसून त्यासाठी सर्वच नेते आणि पक्ष प्रयत्न करत असून चार सहा महिन्यात होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रियाही गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button