⁠ 
सोमवार, जून 17, 2024

पदवीधर निवडणूक! मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त ‘हे’ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राहय धरणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२३ । महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रावर त्यांच्या मताधिकार वापरण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. मात्र, जे मतदार त्यांचे मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सादर करू शकणार नाहीत त्यांनी त्यांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी खालील दहापैकी कोणताही एक पुरावा सादर करता येईल. असे अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ, नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थानी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापिठाद्वारा वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले यूनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID) आदि सादर करुन मतदान करता येईल. असे श्री. मित्तल यांनी कळविले आहे.