---Advertisement---
जळगाव शहर

त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय ; गुलाबरावांचा टोला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. Gulabrao Patil criticizes Sanjay Raut

gulabrao patil 7 jpg webp

एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड पुकारला होता. या बंडामुळे महाविकास आघाडीला पायउतार व्हावं लागलं होते. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार प्रहार केला होता.

---Advertisement---

त्यात गुलाबराव पाटील यांच्यावर देखील सडकून टीका केली होती. दरम्यान, आज जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावं, ‘आमचा पक्ष वाढवण्यामध्ये आमचे लोक कमी पडले, तो पक्ष वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही, असंही गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत. कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, तो पक्ष आम्ही वाचवतोय, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---